बांधकामापूर्वी (Before)

योग्य माणूस निवडणे — 'कोणावर विश्वास ठेवायचा?'

नातेवाईकांनी एका ठेकेदाराचं नाव सांगितलंय, पण त्याला इंजिनिअरिंग कितपत समजतं कुणास ठाऊक?

मूळ कारण

केवळ ओळखीवर किंवा शिफारशीवर विश्वास ठेवणे. ठेकेदाराची चालू कामे आणि तांत्रिक ज्ञान स्वतः न तपासणे.

धोक्याची लक्षणे

ठेकेदार स्वतःची पूर्ण झालेली जुनी घरे दाखवायला टाळाटाळ करतो आणि रोख (Cash) पैशांची मागणी करतो.

खबरदारी

ठेकेदाराच्या चालू असलेल्या किमान 2 साईट्सवर जाऊन काम पाहणे आणि जुन्या मालकांशी एकट्यात बोलणे.

vConstro चा उपाय

आमच्या चालू असलेल्या कोणत्याही साईटवर या, प्रत्यक्ष सिमेंट-स्टील तपासा आणि चालू ग्राहकांशी आमच्या गैरहजेरीत खाजगीत बोला.

संदर्भ

BIS Homeowner Guide

बांधकाम खर्च मोजा